अबुजा : स्थानिक साखर उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन National Sugar Development Council (NSDC) चे कार्यकारी सचिव जैच अदेदेजी यांनी केले. ते म्हणाले की, साखर उत्पादनात आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी देशाला २,५०,००० हेक्टर जमिनीवर शेती केली जाण्याची आवश्यकता आहे.
ते म्हणाले की, देशात कच्च्या साखरेची सातत्याने होणारी आयात हा विकासामध्ये मोठा अडथळा आहे. अदेदेजी म्हणाले की, ऊस शेतीच्या सिंचनासाठी १५,००० हेक्टर जमीन अधिग्रहीत केली असल्याने या क्षेत्रातून देशातील एकूण मागणीच्या ५० टक्के पुरवठा केला जाईल. ते म्हणाले की, Sugar Master Plan पूर्वी देशात प्रक्रिया केलेल्या साखरेची आयात केली जात होती. मात्र, आम्ही २०१३ मध्ये रिफाईंड साखरेची आयात बंद केली आहे. स्थानिक साखर कंपन्यांनी साखरेच्या रिफायनरिंवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे रिफायनरींची क्षमता दुप्पट होऊन ३.५ लाख मेट्रिक टनावर पोहोचली आहे. त्याचा अर्थ नायजेरियाच्या बाहेर साखर निर्यात करण्याची आमची पुरेशी क्षमता आहे.