अबुजा : देशातील साखर उत्पादनात खासगी गुंतवणूकदारांची भागिदारीसाठी सरकार तयार आहे असे नायजेरीयातील उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक मंत्री औटूनबा नियी अदेबायो यांनी सांगितले.
मंत्री अदेबायो म्हणाले, या भागिदारीचा उद्देश देशाच्या आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी आहे. साखर उद्योगात सरकार आणि खासगी गुंतवणुकीद्वारे पहिल्यापासून केलेली कृषी क्षेत्रातील गुंतवणूक उत्पादन क्षेत्राच्या आणि रोजगार निर्मितीची अधिक संधी निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. सरकारने कौशल्य विकास आणि संशोधन, विकासासाठी खासगी भागिदारी वाढविण्याची गरज आहे. साखर उद्योगातील स्पर्धा, उत्पादकतेला बळ देईल.
मंत्री औटूनबा नियी अदेबायो यांनी साखरेच्या वाढीव उत्पादनासाठी तयार केलेल्या मास्टर प्लानमधून साखर विकासातील देशाच्या अपेक्षांची पूर्तता केली जाईल असे सांगितले.