नाइजीरिया मध्ये राष्ट्रीय साखर विकास परिषद (NSDC) यांच्या वतीने संघीय सरकार (फेडरल गर्वन्मेंट) ने साखर उद्योगाची तांत्रिक क्षमता विकसीत करण्यासाठी 114,000 पेक्षा अधिक रोजगार निर्माण करण्याची योजना तयार केली आहे.
NSDC चे कार्यकारी सचिव डॉ लतीफ बुसारी म्हणाले, नाइजीरियाई साखर संस्थानाची आम्ही स्थापना केली आहे, जे या क्षेत्राच्या अनुसंधान आणि प्रशिक्षणावर देखरेख करेल. हे संस्थान नोंदणीकृत आहे. इथे एक एजन्सी नियुक्त करून तांत्रिक मनुष्यबळाची क्षमता वाढवली जाईल, त्यामुळे लोकांना सोप्या पध्दतीने रोजगार मिळेल.
ते म्हणाले की, नव्या विद्याथ्र्याना प्रवेश दिला आहे आणि हा प्रवेश प्रथम श्रेणीतीी विद्याथ्र्या पर्यंतच मर्यादित होता. त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय औद्योगिक नीति आणि प्रतिस्पर्धा सल्लागार परिषदेच्या माध्यमातून संंघीय सरकारने उपराष्ट्रपती प्रा. यामी ओसिनबाजो यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीने संस्थान ची स्थापना व्हावी अशी शिफारस केली आहे.
साखर तस्करीबाबत बोलताना ते म्हणाले की, सीमा बंद झाल्यामुळे तस्करी सध्या कमी आहे. पण संंघीय सरकारकडून लागू केल्या जाणाऱ्या मुक्त व्यापार सामंजस्याची आवश्यकता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.