अबुजा : नायजेरीया २०२३ पर्यंत साखर आयात बंद करू शकेल अशी अपेक्षा कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री मोहम्मद नैनोनो यांनी व्यक्त केली. नैनोनो यांनी अबुजा येथील दोन दिवसीय फीड द फ्यूचर समिट २०२१ च्या उद्घाटन समारंभात सहभाग घेतला. त्यावेळी पोस्ट कोविड १९- ए रिपेअर्ड फूड सिस्टिम, पाथवे टू ए रिवाईव्ड इकॉनॉमी या विषयावर ते बोलत होते.
कृषी मंत्री नैनोनो म्हणाले, सरकारने या क्षेत्राला मजबूत करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न चालवले आहेत. देशाच्या काही भागात तस्करीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू असूनही तांदळाचे खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. मला अपेक्षा आहे की पुढील दोन वर्षात आम्हाला देशामध्ये साखर आयात करावी लागणार नाही. या उद्योगामध्ये झालेली गुंतवणूक आणि आगामी दोन वर्षांमध्ये येणाऱ्या निधीतून आम्ही १.५ मिलियन टन साखरेची देशांतर्गत मागणी पूर्ण करू शकतो असा मला विश्वास वाटतो असे नैनोनो यांनी स्पष्ट केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link