वडवणी : श्रीक्षेत्र निळकंठेश्वर संस्थान वेदांतनगर पाच वर्षांपासून अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून संस्कारयुक्त सुशिक्षित पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता संस्थानच्या वतीने अनाथ, वंचित, उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी आणि ऊसतोड मजुरांच्या मुलांना मोफत शालेय व आध्यात्मिक शिक्षण देण्यात येणार आहे. संस्थानने संस्कारयुक्त सुशिक्षित पिढी घडवण्यासाठी शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षणाची मोफत सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.
संस्थानच्यावतीने सलग तीन वर्ष विनामूल्य बालसुसंस्कार शिबिर, अन्नदान, रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. आता देशसेवा, धर्मसेवा, सत्यप्रिय, मितभाषी, तत्वानुसंधान आणि नीतीमूल्य जोपासणारी पिढी निर्माण करण्यासाठी संत भिमसिंह महाराज वारकरी गुरुकुल आणि मातोश्री इंद्रावणी स्नेहालयाच्या माध्यमातून संस्थान प्रयत्न करणार असल्याचे निलंकठेश्वर संस्थानने म्हटले आहे. यात ऊस तोडणी मजुरांच्या मुलांच्या मोफत शिक्षणाची सोय केली जाणार आहे.