नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्याचबरोबर अजय टम्टा आणि हर्ष मल्होत्रा यांनीही राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये त्यांना ही भूमिका पुन्हा सोपवल्याबद्दल गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार मानले. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत जागतिक दर्जाच्या आधुनिक पायाभूत सुविधांनी वेगाने सुसज्ज होईल असे गडकरी म्हणाले.
रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यमंत्री अजय टम्टा आणि हर्ष मल्होत्रा यांचे परिवहन भवन परिसरात स्वागत केले.
(Source: PIB)