हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
लखनऊ (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
देशात गहू, तांदूळ यांसह साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. केवळ साखरेचाच विचार केला तर, साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी आहे. त्यामुळे दरही घसरले आहेत. परिणामी साखर समुद्रात फेकून देण्याची वेळ येईल, अशी भीती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.
उसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन करून देशापुढील समस्येचे निराकरण होऊ शकते, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. यामुळे तरुणांना रोजगाराची संधीही उपलब्ध होईल, असे त्यांनी म्हटले आहे. मुजफ्फरनगर येथे झालेल्या एका जाहीर सभेत मंत्री गडकरी बोलत होते.
ते म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची किंमत २० रुपये किलो आहे. केंद्राच्या धोरणामुळे देशात साखरेच्या दरांवर नियंत्रण आणण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या थकीत देण्यांचा विचार केला तर ३४ रुपये किलोने साखर विक्री केली तरच साखर कारखान्यांना फायदा होणार आहे. आपल्याला ब्राझीलसारखेच तंत्रज्ञान आणि धोरण लागू करावे लागेल आणि त्यातूनच या समस्येचे निराकरण होईल.’
ज्या पद्धतीने साखरेचे उत्पादन वाढत आहे. त्या गतीने एक दिवस साखर समुद्रात फेकून देण्याची वेळ येईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. उत्तर प्रदेशचे ऊस मंत्री सुरेश राणा यांनी माझी भेट घेऊन संपूर्ण तंत्रज्ञान व इतर विषय समजून घ्यावेत, असे आवाहन मंत्री गडकरी यांनी केले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp