विमान कंपन्यांमध्ये प्रवाशांना चहा/कॉफी देताना गोड पदार्थ म्हणून मधाची पॅकेटस उपलब्ध करुन द्यावीत, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. पुण्यातील मध्यवर्ती मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेत (सीबीआरटीआय) ते बोलत होते.
साधारणपणे एक चमचा मध तीन चमचे साखरेइतका असतो. सध्या प्रवाशांना रिफाइन्ड साखर पुरवली जाते. म्हणून आम्ही विमानात आणि हॉटेल्समध्ये मधाची पॅकेटस किंवा क्यूब उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करु, असे सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री यांनी सांगितले.
सरकार मध क्लस्टर तयार करण्याच्या विचारात आहे. मध उत्पादन वाढवण्यावरही सरकार लक्ष केंद्रीत करेल. शिवाय मधाची विविध उत्पादने बनवण्याच्या सरकार विचारात आहे. अशा क्लस्टर्समुळे देशातील ग्रामीण आणि आदीवासींच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढेल, असेही त्यांनी सांगितले.
गडकरी म्हणाले, मंत्रालय ग्रमीण भागातील अर्थव्यस्था बळकट करण्यासाठी आणि येत्या पाच वर्षात त्यांची उलाढाल पाच लाख कोटी रुपयांवर जाईल. ते दूध, मध, बांबू, इथेनॉल किंवा जैवइंधन असोत, या सर्व क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.