केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २९ ऑगस्ट रोजी टोयोटा इनोव्हाची पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी नवी आवृत्ती लॉन्च केली. या कार्यक्रमाला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हेदेखील उपस्थित होते.
या कारचे लाँचिंग म्हणजे भारताचे आयात पेट्रोलियमवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनावरील भार कमी करण्याच्या सरकारच्या धोरणाला प्रोत्साहन मिळणार आहे.
याबाबत टोयोटाच्या निवेदनानुसार, टोयोटा इनोव्हा इथेनॉल-इंधन असलेले हे वाहन जगातील पहिले BS-VI (स्टेज-II) विद्युतीकृत फ्लेक्स-इंधन वाहन असेल. गेल्यावर्षी, गडकरी यांनी पूर्णपणे हायड्रोजन – विजेवर चालणारी टोयोटा मिराई ईव्ही कार सादर केली होती.
अलीकडेच, मंत्र्यांनी एका परिषदेत याबाबत घोषणा केली होती. इथेनॉलवर चालणारी इलेक्ट्रिक फ्लेक्स- फ्युएल इंधन टोयोटा इनोव्हा एमपीव्ही लाँच करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.