अहिल्यानगर : दिवाळी सणानिमित्त जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने अशोक साखर कारखान्याने अंतिम दर द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संचालक मंडळाकडे केली. मात्र, त्याबाबत कोणताही ठोस निर्णय संचालक मंडळाने घेतला नाही, अशी माहिती जितेंद्र भोसले यांनी दिली. कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांच्याशी चर्चा करून अंतिम दर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
अशोक साखर कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांना उसाचे अंतिम दराचे पैसे अदा केलेले नाहीत. गणेश साखर कारखान्याने अंतिम दराचे मिळून ३ हजार रुपये प्रति टनाप्रमाणे ऊस दर दिला आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी संचालक मंडळ, तसेच कार्यकारी संचालकांशी चर्चा केली. यावेळी सुरेश ताके, बाळासाहेब उंडे, गोविंद वाबळे, ज्ञानदेव थोरात, संदीप गवारे, दत्तात्रय लिप्टे, अशोक बनकर, नामदेव येवले, राजाभाऊ थोरात, प्रकाश थोरात, बाळासाहेब दौंड उपस्थित होते. कारखाना सभासदांनी अंतिम दराचे प्रति टन ३०० रुपयांप्रमाणे मागणी केली आहे. कारखान्याने आजअखेर २७०० रुपये दर दिला आहे. येणाऱ्या गाळप हंगामात ३५०० रुपये पहिली उचल दिल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.