लोकनेते देसाई कारखान्याकडून कोणताही बेकायदेशीर ठराव नाही : चेअरमन यशराज देसाई

सातारा : सह्याद्री कारखान्याला ऊस गाळप करणारे कोणतेही गाव अथवा सभासद लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राला जोडणार नसल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. सुपने मंडलातील काही गावांचा पाटण विधानसभा मतदारसंघाचे सलोख्याचे ऋणानुबंध तयार झाले आहेत. त्यामुळे ज्या गावांचा सह्याद्री कारखान्याला ऊस गाळप होत नाही, मात्र इतर कारखान्याला ऊसाचे गाळप होते, अशी गावे त्या गावांच्या मागणीनुसार आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्राला जोडावीत,असा ठराव देसाई कारखान्याच्या वार्षिक सभेत घेण्यात आला आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.

चेअरमन देसाई यांनी सांगितले की, पाटण मतदार संघाशी सुपने मंडलातील गावांचा पर्यायाने जनतेचा पाटणशी वेगळे ऋणानुबंध निर्माण झाले असल्याने या विभागातील अनेक गावांनी ज्या गावांचा सह्याद्रीला ऊस न जाता जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांना ऊस जातो अशा गावांनी बाळासाहेब देसाई कारखान्याच्या कार्यक्षेत्रात घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळेच केवळ त्याच गावांना बाळासाहेब देसाई कारखान्याच्या कार्यक्षेत्राशी जोडण्याचा ठराव वार्षिक सभेत घेण्यात आला आहे. सह्याद्री आणि पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई हे दोन्ही सहकारी साखर कारखान्यामध्ये आज अखेर कधीही ऊस, सभासद आणि कार्यक्षेत्राच्या बाबतीत आपापसात कधीही मतभेद झाले नाहीत आणि यापुढे ही होणार नाहीत,असे देसाई यांनी पत्रकात म्हटले आहे.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here