राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नव्या कोविड १९ च्या ओमायक्रॉन व्हेरियंटनंतर कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन लावण्यासंदर्भात शक्यता फेटाळून लावल्या आहेत. ३ टी फॉर्म्युल्यावर आम्ही भर देत आहोत असे यावेळी टोपे यांनी स्पष्ट केले.
या फॉर्म्युल्यामध्ये कोविड १९च्या नियमांचे पालन करण्यासह परिक्षण, ट्रॅकिंग आणि उपचार या गोष्टींचा समावेश आहे. महाराष्ट्रात नव्या व्हेरियंटचे रुग्ण नव्याने आढललेले नाहीत. कल्याण-डोंबिवली मध्ये आढळलेल्या रुग्णंपैकी एकाची नोंद घेण्यात आली असून दहा जण निगेटिव्ह असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
टोपे यांनी सांगितले की, महाराष्ट्र कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन लावण्याबाबत विचार करीत नाही. राज्यातील टास्क फोर्सने असे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. आम्ही स्थितीवर नजर ठेवून आहोत. केंद्र तसेच राज्याचा टास्क फोर्स, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर पुढील निर्णय घेतले जाणार आहेत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.