नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर बंदी घालण्याचा सरकारचा कोणताही हेतू नसल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यासंदर्भात चर्चा झाली आणि पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी घालावी, अशी सूचना मंत्रालयाला मिळाली होती. पण, मी हे स्पष्ट करू इच्छितो की पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर बंदी घालण्याचा सरकारचा हेतू नाही.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) वार्षिक अधिवेशन, 2019 मध्ये आयोजित संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते. केंद्रीय मंत्र्यांनी असेही नमूद केले की, निर्यातीच्या बाबतीत भारताच्या वाहन उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि या उद्योगाला रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत.
प्रदूषण कमी करणे हे राष्ट्रीय हिताचे असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, प्रदूषणाच्या समस्येसाठी केवळ वाहनांनाच दोष देणे योग्य नाही. दिल्लीतील प्रदूषणाचा परिणाम प्रत्येकाच्या आरोग्यावर झाला आणि जगानेही त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीत प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे स्पॉट्स ओळखण्यासाठी 50000 कोटी रुपयांची योजना आखली गेली आहे. यामुळे दिल्लीतील सुमारे 29 टक्के प्रदूषण नियंत्रीत होत आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्राने गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे सांगून ते म्हणाले, भारत प्रथम क्रमांकाचे उत्पादन केंद्र बनू शकेल. वाहन कंपन्या किमतीवर केंद्रित नसून दर्जेदार असाव्यात. राज्य परिवहन महामंडळाची स्थिती चांगली नाही. लंडन परिवहन मॉडेल आणण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.
सार्वजनिक वाहतुकीवर भर देताना गडकरी म्हणाले, सार्वजनिक वाहतुकीमध्ये क्षमता आहे. जर आपण लंडन परिवहन मॉडेल लागू केले तर 12 ते 15 लाख नवीन बस सुरू होतील. व्यवसाय जोडण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.