24 तासात दिल्लीत कोरोना वायरसचा नवा रुग्ण नाही : अरविंद केजरीवाल

दिल्ली : गेल्या 24 तासात राष्ट्रीय राजधानी असणार्‍या दिल्लीमध्ये कोरोना वायरसचे कोणतेही नवे प्रकरण नोंदवले गेलेले नाही. ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावू नये, हेच आता मोठे आव्हान असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
कोविड 19 संक्रमित ज्या पाच जणांवर उपचार चालू होते, त्या पाच जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आल्याचे, ट्वीट मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केले आहे.

गेल्या 24 तासात कोरोना वायरसची नवी केस नाही म्हणून लगेच एक्साईट न होता, आता ही परिस्थिती कशी नियंत्रणात राहील याबाबत जनतेचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीमध्ये कोरोना वायरसचे आतापर्यंत 30 रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशभरातून या आजाराची 492 प्रकरणे नोंदली गेली आहेत. या आकडेवारीत 41 विदेशी नागरीक आणि 9 मृतांचा समावेश आहे.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here