बिजनौर: जिल्हयातील ६ साखर कारखान्यांना सध्याच्या गाळप हंगामाचे शंभर टक्के पैसे न भागवल्यामुळे नोटीस देण्यात आली आहे. या कारखान्यांनी या वर्षातली देणी अजूनही भागवलेली नाहीत.
साखर कारखान्यांचा अर्धा गाळप हंगाम पूर्ण झाला आहे. जिल्हयातील बुंदकी, बहादरपुर व सहकारी क्षेत्रातील नजीबाबाद येथील कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देत आहेत, पण जिल्हयाच्या बाकी ६ साखर कारखान्यांनी वेळेवर पैसे दिलेले नाहीत. या कारखान्यांना प्रशासनाने नोटीस देऊन लवकरात लवकर देणी भागवावीत असे सांगितले आहे. जर देणी भागवली नाहीत तर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. यामधील काही कारखान्यांना बँकांकडून सीसीएल मंजूर झाले आहे. चांदपूर कारखान्याने गेल्या गाळप हंगामातील देणी शंभर टक्के भागवली आहेत. आता हा कारखाना चालू गाळप हंगामातील देणी भागवेल. बिजनौर साखर कारखान्याने गेल्या हंगामाची देणी अजून पर्यंत भागवलेली नाहीत. कारखान्यावर आता देखील गेल्या गाळप हंगामातील ९.८ करोड रुपये देय आहे.
जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांच्या मतानुसार थकबाकी भागवण्यासाठी कारखान्यांना नोटीस दिली गेली आहे. तसेच साखर कारखान्यांवर दबाव निर्माण केला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.