बिजनौर (उत्तर प्रदेश): ऊसाचे पैसे वेळेवर न दिल्यामुळे जिल्ह्यातील 9 पैकी सहा साखर कारखान्यांना नोटीस देण्यात आली आहे. साखर कारखान्यांकडून ऊसाचे पैसे 14 दिवसांच्या आत देण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने आताही गाळप करत आहेत. लॉकडाउन मुळे साखर कारखान्यांचे गाळप सत्र उशिरापर्यंत सुरु आहे, साखरेलाही उठाव नाही. साखरेला उठाव नसल्यामुळे कारखान्यांनाही पैसे मिळत नाहीत आणि त्यामुळे शेतकर्यांची थकबाकी वसूल होत नाही. जिल्ह्यातील बिजनौर, चांदपूर, बिलाई आणि बरकातपूर साखर कारखाने पहिल्यापासूनच थकबाकी भागवण्यात पिछाडीवर होते. याशिवाय आता स्योहारा आणि बुंदकी साखर कारखानेही थकबाकी भागवण्यात पिछाडीवर आहेत.. स्योहारा साखर कारखान्यावर 125.45 करोड, भिलाई कारखान्यावर 271.93 करोड, बरकातपूर वर 129.52 करोड, बुंदकी साखर कारखान्यावर 27.57 करोड, चांदपूर कारखान्यावर 120.52 करोड व बिजनौर साखर कारखान्यावर 81.38 करोड रुपये देणे बाकी आहेत. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, थकबाकी न भागवणार्या साखर कारखान्यांना नोटीस देण्यात आली आहे. कारखान्यांनी निर्धारीत केलेल्या वेळेच्या आत पैसे भागवण्याचे निर्देश दिले आहेत. वेळेवर पैसे न भागवणार्या कारखान्यां विरोधात कारवाई केली जाईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.