बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
पुणे : चीनी मंडी
एफआरपी थकविल्याप्रकरणी राज्यातील ३९ साखर कारखान्यांना साखर जप्तीची (आरआरसी) नोटिस बजावल्यानंतर साखर आयुक्तालयाने १३५ साखर कारखान्यांना नोटिस बजावली आहे. तुमच्यावर आरआरसी कारवाई का करू नये? अशी नोटिस देण्यात आली आहे. यात कोल्हापूर विभागातील २४ साखर कारखान्यांचा समावेश आहे. याप्रकरणी १ आणि २ फेब्रुवारीला पुण्यात साखर आयुक्तालयात सुनावणी होणार आहे.
यंदाचा साखर हंगामा निम्म्यावर आला तरी, ऊस उत्पादकांच्या एफआरपीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. राज्यात फक्त ११ साखर कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंत एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. राज्यात अद्याप १८० कारखान्यांनी एफआरपीची रक्कम थकवली आहे. ही थकबाकी ५ हजार ३०० कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्तालयावर हल्लाबोल आंदोलन केल्यानंतर साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
कारवाईची धास्ती
दरम्यान, साखर जप्तीची नोटिस बजावलेल्या कारखान्यांची जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच दोन टप्प्यांतील एफआरपीला शेतकरी संघटनांचा विरोध आहे, असे सांगून कारखान्यांनी एफआरपी जमा करण्याला टाळा टाळ केली होती. पण, साखर आयुक्तालयाकडून नोटिस काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही कारखान्यांनी शेतकऱ्यांच्य खात्यांवर २३०० रुपयांप्रमाणे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे.
नोटिस मिळालेली कोल्हापूर विभागातील कारखाने
कोल्हापूर – सदाशिवराव मंडलिक, उदयसिंगराव गायकवाड, महाडिक शुगर्स, कुंभी-कासारी, दालमिया शुगर्स, इंदिरा (अथणी शुगर्स), डॉ. डी. वाय. पाटील, शाहू कारखाना, छत्रपती राजाराम, भोगावती, नलवडे शुगर्स, हेमरस. सांगली : सोनहिरा, उदगिरी, सद्गुरू, राजारामबापू (वाटेगाव), राजारामबापू (सर्वोदय), राजारामबापू (साखराळे), मोहनराव शिंदे, क्रांती, किसन अहीर, हुतात्मा.
कारखाने आणि थकबाकी (रक्कम कोटी रुपयांत)
आजरा – ३५.११
नलवडे शुगर्स – २६.७०
भोगावती – ४०.७७
छत्रपती राजाराम – ४४.७५
छत्रपती शाहू – ६४.०४
डी. वाय. पाटील – ३०.४४
दालमिया शुगर्स – ८३.९४
बिद्री – ६०.६९
हेमरस – ५९.२१
सदाशिवराव मंडलिक – ४१.३३
उदयसिंगराव गायकवाड – २८.०९
महाडिक शुगर्स – २२.७३
कुंभी-कासारी – ४४.६१
इंदिरा (अथणी शुगर्स) – २६.५०
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp