पुणे : चीनी मंडी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची बिले थकविल्याप्रकरणी कोल्हापूर विभागातील १५ साखर कारखान्यांना जिल्हाधिकारी कार्यालयांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यंदाच्या २०१८-१९च्या हंगामातील उसाचे पैसे थकविल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याचे साखर आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साखर कारखान्यांना १५ डिसेंबरपर्यंत ३६० कोटी रुपये देणे आवश्यक होते. तर, नोव्हेंबरअखेर एफआरपीचे एकूण २४० कोटी रुपये देय होते. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून अधिकृतरित्या सुरू झाला. मात्र, काही साखर कारखान्यांनी दिवाळीनंतर प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात गाळप सुरू केले.