उसाचे पाने जाळण्याच्या घटनामुळे डीसीओना नोटीस

मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश: प्रदेशातील उस आयुक्त संजय आर भूसरेड्डी यांनी उसाची वाळलेली पाने जाळण्याच्या घटना पाहताना डीसीओ आरडी द्वीवेदी यांच्या सह आठ जिल्हा उस अधिकार्‍यांना नोटीस देण्यात आली आहे. उस विभागाला निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी विविध माध्यमातून शेतकर्‍यांना जागरुक करावे.

वायु प्रदूषणाला रोखण्यासाठी उसाची वाळलेली पाने जाळण्यावर पूर्ण प्रतिबंध घातला आहे. उसाची पाने जाळण्याच्या तक्रारीनंतर उस आयुक्त संजय आर भूसरेड्डी यांनी आठ जिल्ह्यातील जिल्हा उस अधिकार्‍यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये सहारनपुर, मुजफ्फरनगर, मेरठ, शाहजहांपूर, लखीमपूर, सीतापुर, कुशीनगर तसेच महाराजगंज जिल्हा सामिल आहे. सर्व जिल्हा उस अधिकारी, उस उपायुक्त आणि साखर कारखान्यांना निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी कृषी बैठक, शेती जत्रा, पंपलेट, वॉल पेटिंग, बातमीपत्रे, दूरदर्शनच्या माध्यमातून शेतकर्‍यांना जागरुक करावे. फार्म मशीनरी बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आरएमडी ट्रेश मल्चर उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शेतकरी उसाची वाळलेली पाने खताच्या रुपात सहपणे उपयोगात आणू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here