बीड : वैद्यनाथ साखर कारखान्याला १९ कोटी रुपये जीएसटी भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे १९ कोटी रुपयांची जीएसटी थकीत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तांनी कारखान्यास कराची वसुली आणि मालमत्ता जप्तीची नोटीस जारी केली आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना चेअरमन पंकजा मुंडे म्हणाल्या की, साखर कारखाना तोट्यात असतानाही शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले आहेत. ऊसाची कमी उपलब्धता आणि आर्थिक अडचणींमुळे कारखाना चालला नाही. मात्र जे आकडे सांगितले जात आहेत, ते व्याजाबाबत आहेत. कारखान्यात काहीही चुकीचे झालेले नाही. दिल्लीत ८ ते ९ कारखान्यांनी मदत मागितली होती. त्यात माझेही नाव होतं. पण, मी सोडून बाकींना आर्थिक मदत झाली. मदत मिळाली असती, तर असा प्रकार घडला नसता, असे सांगितले.