कासगंज : नव्या गळीत हंगामात खरेदी केलेल्या उसाचे पैसे देण्याची गती अतिशय संथ आहे. ५४ कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी फक्त ८१ लाख रुपये साखर कारखान्याने दिले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर शेतकऱ्यांना पैसे मिळावेत यासाठी ऊस विभाग सक्रीय झाला आहे. विभागाने साखर कारखान्याला नोटीस पाठवून पैसे देण्याची गती वाढवावी असे सांगितले आहे.
न्यौली कारखान्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसह बदायू आणि अलिगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडूनही ऊस खरेदी केला आहे. उसाचे गाळप योग्य पद्धतीने करून साखर उत्पादित केली. मात्र, कारखान्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उसाचे पैसे देण्याबाबत गांभीर्य दाखवलेले नाही. गाळप बंद होऊन चार महिने उलटले तरी शेतकऱ्यांना फार कमी पैसे मिळाले आहेत. फक्त ८१ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.
पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल आहेत. नव्या हंगामात खरेदी केलेल्या उसाचे पैसे मिळालेले नाहीत. या सत्रात कारखान्याने १७ लाख क्विंटल ऊस खरेदी केला आहे. कारखान्याकडे ५४ कोटी रुपयांची थकबाकी होती. पैसे न मिळाल्याने शेतीकामे खाळंबली आहेत. याआधीही कारखान्याने पैसे दिले नसल्याचे शेतकरी हरिओम मिश्रा, पाना देवी यांनी सांगितले. कारखान्याला नोटीस जारी करून पैसे देण्यास सांगितले आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे मिळावेत असे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा ऊस अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link