हापुड : ऊस बिलांची थकबाकी देण्यात पिछाडीवर असलेल्या दोन साखर कारखान्याना ऊस विभागाने नोटीस जारी केली आहे. ब्रजनाथपूर साखर कारखान्याने गेल्या हंगामातील ऊस बिले दिली आहेत. मात्र, चालू हंगामातील १०० कोटी रुपये थकीत आहेत. दुसरीकडे सिंभावली साखर कारखान्याकडे गेल्या हंगामातील थकबाकी आहे. दोन्ही कारखान्यांकडे गेल्या दोन हंगामातील ४३१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ऊस थकबाकीचा मुद्दा निवडणुकीत चर्चेचा ठरला आहे. त्यानंतरही साखर कारखाने आणि प्रशासाने यााबबत कोणतीही पावले उचललेली नाहीत.
सरकार आणि जिल्हा ऊस अधिकाऱ्यांकडून ऊस उत्पादकांना गेल्या हंगामातील थकीत बिले देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ज्या कारखान्यांकडे थकबाकी आहे, त्यांनी पैसे गतीने द्यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळेच सिंभावली आणि ब्रजनाथपूर कारखान्याला नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा ऊस अधिकरी निधी गुप्ता यांनी सांगितले की, सिंभावली कारखान्याकडे ४५८ कोटी तर ब्रजनाथपूर कारखान्याकडे ४३१ कोटी अशी एकूण ८८९ कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. त्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.