हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या संचालकांना एस एम एस द्वारे जीएसटी कर परताव्याबाबत विविध सूचना पाठवण्याची पद्धत चालू करुन सरकारने जीएसटी अंमलबजावणीत अधिक सूसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. विविध कंपन्यांच्या संचालकांना याबाबतीत एस एम एस प्राप्त झाल्यावर त्यांनी कर परताव्यातील त्रुटी सुधारल्या आहेत.
ही पध्दत सरकार वापरत असलेल्या पाच इशारा प्रणाली पैकी एक आहे. संचालकांना असे मॅसेज गेल्यामुळे त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या कर्मचाऱ्यांकडून जीएसटी भरण्यासंदर्भात काही उणिव राहून गेली असल्यास त्याच्या सुधारणेचा पाठपुरावा संचालकांना करता येईल. मात्र ही सुविधा दरमहा एक लाखाच्या वर जीएसटी भरणाऱ्या कंपन्यांसाठी आहे.