सोलापूर : चांदापुरातील ओंकार साखर कारखान्याची गाळप क्षमता पूर्वी कमी होती. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करण्यात मर्यादा होत्या. हे ओळखून ओंकार परिवाराचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील, संचालिका रेखा बोत्रे, संचालक प्रशांत बोत्रे पाटील यांनी प्रती दिन गाळप क्षमतेत वाढ करण्याचे नियोजन केले. यंदा २०२४-२५ या हंगामासाठी चार हजार टन गाळप क्षमतेचा नवीन प्रकल्प मंगळवारी पहाटे तीन वाजता प्रशांत बोत्रे पाटील यांच्या हस्ते पूजनाने सुरू करण्यात आला.
दरम्यान, कारखान्यात नवीन प्रकल्प कार्यान्वित झाला असून, आता प्रती दिन ऊस गाळप क्षमता ६५०० टन करण्यात आली असल्याची माहिती प्रशांत बोत्रे-पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, यापुढे ऊस गाळपाची, वाहतूकदारांच्या व ऊसदराची समस्या राहणार नाही. जुन्या कारखान्याची गाळप क्षमता कमी असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संपूर्ण उसाचे गाळप करू शकत नव्हतो. ही अडचण लक्षात घेऊन चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी प्रतिदिन गाळप क्षमतेत वाढ व उपपदार्थ निर्मिती प्रकल्प हाती घेतले. आता त्याचा शुभारंभ करण्यात आला. जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे, कन्सल्टंट सुरेश तावरे, चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकाते, डिस्टिलरी मॅनेजर पी. डी. पाटील, धनाजी पवार, धन्यकुमार जमदाडे, अमोल तरंगे आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.