बागपत : ऊस पिकाच्या धर्तीवर आता सर्व पिकांचा डिजिटल सर्व्हे होणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील २४४ गावात सर्व्हे होणार आहे. त्यासाठी सर्वेअर तयार आहेत. शेतात लागवड करण्यात आलेले पिक आणि त्याचे क्षेत्रफळ याची अचूक माहिती यातून उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल असे सांगण्यात आले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकार आता खरीप आणि रब्बी पिकांचा सर्व्हे करणार आहे. डिजिटल सर्व्हेसाठी लेखपाल, कृषी विभागाच्या तांत्रिक सहाय्यकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यातील दहा गावात पायलट प्रोजेक्टच्या रुपात ही योजना लागू करण्यात आली आहे. सर्वेक्षणातून शेतातील पिकांची अचूक माहिती मिळेल.
याबाबत डीडी ॲग्रिकल्चर दूरविजय सिंह म्हणाले की, डिजिटल क्रॉप सर्व्हेचा लाभ शेतकऱ्यांना होईल. आपले पिक विक्रीसाठी नोंदणी करणे, त्याची पडताळणी यापासून त्यांची सुटका होईल. पिकाविषयी सर्व माहिती मिळू शकेल. शेतकरी आपले पीक एमएसपीच्या दराने विक्री करू शकतात. मोबाईल ॲपद्वारे ॲग्री स्टॅकने सर्व्हे केला जाणार आहे. शेतात हे ॲप आपले काम सुरू करेल.