आयआयटी गुवाहटीकडून बगॅसपासून Xylitol उत्पादनाचे तंत्रज्ञान विकसित

नवी दिल्ली : देशात ठिकठिकाणी साखर उद्योगाशी संलग्न नवनवे संशोधन सुरू आहे. या नव्या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढीसह देशाच्या विकासाचा मार्ग शोधला जात आहे. या अंतर्गत भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गुवाहटीही सामील झाले आहे. या संस्थेतील संशोधकांनी उसाचे गाळप केल्यानंतर उरलेल्या अवशेषातून साखरेचा पर्याय ‘झायलिटॉल’ ‘Xylitol’ तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. हे संशोधन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी आणि अल्ट्रासोनिक्स सोनोकेमिस्ट्री जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. रासायनिक संश्लेषण पद्धतींच्या मर्यादा आणि पारंपारिक किण्वनाशी संबंधित विलंबावर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे.

PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, आयआयटी गुवाहाटीच्या केमिकल इंजिनीअरिंग विभागातील के. व्ही. एस. मोहोलकर यांनी सांगितले की, झायलिटॉल केवळ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीच नव्हे तर सामान्य आरोग्यासाठीही लाभदायक आहे. Xylitolमध्ये नैसर्गिक उत्पादनांमधून मिळविलेल्या साखरेचे अल्कोहोल, संभाव्य अँटी-डायबेटिक आणि अँटी-ओबेसोजेनिक प्रभाव आहे, हे सौम्य प्रीबायोटिक आहे. आणि ते दातांचे क्षयापासून संरक्षण करते. या किण्वन प्रक्रियेदरम्यान अल्ट्रासाऊंडच्या वापरामुळे पारंपारिक प्रक्रियेला लागणाऱ्या ४८ तासांच्या तुलनेत किण्वनासाठी केवळ १५ तास लागतात. याशिवाय उत्पादनात सुमारे २० टक्के वाढ झाली. संशोधकांनी किण्वन करताना फक्त १.५ तास अल्ट्रासाऊंड वापरले. त्यामुळे या प्रक्रियेत अल्ट्रासाऊंडची जास्त ऊर्जा वापरली गेली नाही. सध्याचे संशोधन प्रयोगशाळेच्या स्तरावर केले जात आहे. व्यावसायिक स्तरावर ते करण्यासाठी आणखी आव्हानांना सामोरे जावे लागेल असा दावा संशोधकांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here