चंदीगड/शिमला : देशातील सर्वच साखर उत्पादक राज्ये साखर विक्रीसाठी नव्या संधी आणि बाजारपेठेच्या शोधात आहेत. साखरेच्या विक्रीच्या वाढत्या स्पर्धेचा फायदा साखर खरेदी करणार्या राज्यांना होत असल्याचे दिसत आहे. पंजाब आणि हरियाणा मध्ये साखर विक्रीसाठी धूम माजली आहे, ज्याचा फायदा हिमाचल प्रदेशसारख्या राज्याला होत आहे. आता हिमाचल राज्या कडे साडे आठरा लाख रेशनकार्ड धारक कुटुबांना साखर अधिक स्स्त मिळू शकते. हिमाचल सरकार पंजाबातून स्वस्त साखर आणण्याच्या तयारीमध्ये आहे. आता हरियाणा सरकारकडून 33 रुपये प्रति किलो च्या हिशेबाप्रमाणे पुरवठा केला जात आहे. पंजाब सरकारने देखील हिमाचल ला साखर देण्यावर सहमती दाखवली आहे. खाद्य नागरीक एवं ग्राहकांच्या बाबतीत विभागाचे सचिव अमिताभ अवस्थी यांनी सांगितले की, जो हिमाचल स्वस्त साखर देईल, त्यांच्याकडून साखर विकत घेतली जाईल.
पंजाब सरकारची एक टीम सिमला पोचली असून हरियाणाकडून दिल्या जाणार्या साखरेच्या पुरवठ्याचा रेट आणि वाहतूक खर्च आदींचा ताळेबंद घेंतलेला आहे. हिमाचल सरकारच्या म्हणण्यानुसार, दोन्ही राज्यांमधील स्पर्धेचा फायदा हिमाचल ला होईल. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची नुकतीच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी साखरेबाबत चर्चा झाली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.