उत्तर प्रदेश: ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक जारी

मेरठ : चालू महिन्यापासून गळीत हंगाम सुरू होत आहे. त्या अनुषंगाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस तथा साखर विभागाच्यावतीने टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे. शेतकरी १८००१२१३२०३ या क्रमांकावर आपल्या समस्यांबाबत तक्रारी दाखल करू शकतात. लखनौतील ऊस आयुक्त कार्यालयात याबाबत कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. राज्यभरातील शेतकरी येथे आपल्या अडचणी मांडू शकतात.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस तथा साखर विभागाने या गळीत हंगामासाठी तोडणी पावती तथा ऊस पुरवठा धोरण जारी केले आहे. त्याअंतर्गत ऊस खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेत बेसिक ऊस कोट्याचे हस्तांतरण, ठिबक सिंचनाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना तोडणीमध्ये प्राधान्य देणे, सैनिक, माजी सैनिक, अर्धसैनिक दले, स्वातंत्र्यसेनानींचे वारस अशांना प्राधान्य दिले जाईल. ऊस पुरवठा धोरणात नियमीतसाठी हेक्टरी ८५० क्विंटल, अल्प गटातील शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरमध्ये १७०० क्विंटल, सामान्य शेतकऱ्यांसाठी ५ हेक्टरमध्ये ४२५० क्विंटल आदी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. उत्पादनात वाढ झाल्यास, नियमितसाठी १३५० क्विंटल, लघू गटासाठी २७०० क्विंटल आणि सर्वसाधारणसाठी ६,७५० क्विंटल अशी सट्ट्यासाठी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here