आता मुंबई ते गोवा प्रवास करा, अवघ्या सहा तासात, एनएच ६६चे पुढील महिन्यात लोकार्पण

मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या विस्तारीकरणानंतर मुंबई ते गोवा प्रवासाचा वेळ १० तासांवरून ५ ते ६ तासांवर येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे.

मनीकंट्रोल वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकार अनेक एजन्सींच्या सहकार्याने मुंबई-गोवा महामार्गाच्या विस्ताराचे काम अनेक दशकांपासून करत आहे. पुढील महिन्यात गणेश चतुर्थीपूर्वी हे काम पूर्ण होणार आहे. महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर मुंबई ते गोवा प्रवासाचा वेळ ५ ते ६ तासांवर येणार आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत पीडब्ल्यू तातडीने पावले उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘मुंबई-सिंधुदुर्ग रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. समृद्धी महामार्गाचा १८ तासांचा प्रवास ८ ते १० तासांवर आणला. सरकार अशा स्वतंत्र सुविधांच्या विस्ताराला प्राधान्य देत आहे. कोकणातही अशाच प्रकारचा सुविधा विस्तार केला जाईल.’

हा चौपदरी १,६०८ किमी लांबीचा एनएच ६६ महामार्ग सुरू होईल, तेव्हा तो भारतातील अनेक राज्यांना जोडेल. तसेच गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाईल. मुंबईतील पनवेलला कन्याकुमारीमधील केप कोमोरिनशी जोडले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here