NSI कडून ऊस पिकासोबत गोड ज्वारीच्या आंतरपिकाची चाचणी

कानपूर : नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटने (NSI) इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी पर्यायी फीडस्टॉक विकसित करण्याच्या प्रयत्नात साखर उद्योगातील समूह, बलरामपूर शुगर मिल्स लिमिटेड आणि दालमिया भारत शुगर मिल्स लिमिटेडच्या सहकार्याने गोड ज्वारीच्या (sweet sorghum) च्या आंतरपिकाचे परिक्षण करण्यासाठी भागीदारी केली आहे. गोड ज्वारीच्या पाच प्रजातींचे CSH२२SS, SS७४, SS८४, फुले वसुंधरा आणि ICSSH२८ चे परिक्षण ICAR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च, हैदराबादकडून करण्यात आले. त्यांनी गोड ज्वारीचे सरासरी उत्पादन ५०-५५ टन प्रती हेक्टर आणि इथेनॉल उत्पादन जवळपास ४५-५० लिटर प्रती मेट्रिक टन होईल असे संकेत दिले आहेत.

नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट कानपूरचे संचालक प्रो. नरेंद्र मोहन यांनी सांगितले की, आता आम्ही ऊस लागवडीच्या दोन सरींदरम्यान ऊस पिकासोबत गोड ज्वारीच्या पिकाचे अंतिम परिक्षण केले आहे. यामध्ये शुगर कंपन्यांच्या मदतीने गोंडा आणि शाहजहाँपूर जिल्ह्यात गोड ज्वारीची लागवड कर्यात आली. एकाच शेतात गोड ज्वारी आणि ऊस उत्पादन केल्याने शेतकऱ्याला एकाच शेतात अधिक उत्पन्न मिळण्यास मदत मिळाली. प्रती हेक्टर जमिनीपासून इथेनॉल उत्पादन मिळवणे शक्य होणार आहे. ते म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात प्रती हेक्टर ३५ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. तर इथेनॉल उत्पादन क्षमतेत जवळपास ३० टक्क्यांची वाढ होवू शकतो.

प्रोफेसर मोहन म्हणाले की, थंड हवामानाच्या परिस्थितीत बीट हा चांगला पर्याय आहे. संस्थेने उत्तर भारतात नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत अनुकूल परिस्थिती असताना त्याच्या उत्पादनाच्या शक्यता तपासल्या आहेत. आम्ही शेतांमध्ये तीन प्रजाती LS६, LKC२०२०, IISR COMP चे परीक्षण केले आहे. बीटचे उत्पादन जवळपास ६०-८० टन प्रती हेक्टर मिळाले आणि इथेनॉल उत्पादन उसाच्या तुलनेत जास्त, ८०-१०० लिटर प्रती टन मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here