एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ लिमिटेडने देशाच्या 9.56% उत्पादन वृद्धीच्या तुलनेत, आर्थिक वर्ष 23 मध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यंत उत्पादनात 11.92% म्हणजेच 364.2 बीयु वृद्धी नोंदवली आहे.
एनटीपीसीच्या बंदिस्त खाणींमधून कोळसा उत्पादनात वाढता कल दिसतो. एनटीपीसीचे बंदिस्त खाणीतील कोळशाचे उत्पादन 2.6 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) होते, तर वितरण 2.5 एमएमटी होते, अशा प्रकारे मागील वर्षाच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये अनुक्रमे 80% आणि 87% ची भक्कम वाढ नोंदवली गेली. एकत्रितपणे, आर्थिक वर्ष 23 मध्ये कोळसा उत्पादन 20 दशलक्ष मेट्रिक टनाहून अधिक होते.
एनटीपीसी ने कोळसा खाणींमधून कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. उच्च-क्षमतेच्या डंपरच्या वापरामुळे तसेच उत्खनन करणार्यांच्या सध्याच्या ताफ्यात वाढ झाल्यामुळे कार्यरत खाणींना त्यांचे उत्पादन वाढविण्याची परवानगी मिळाली आहे.
एनटीपीसी समूहाची स्थापित क्षमता 71594 मेगावॅट आहे.