नुमालीगड रिफायनरी करणार बांबूपासून इथेनॉल उत्पादन

कोलकाता : देशात इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी अनेक कंपन्या पुढे येत आहेत. आसाममध्येही इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत.

आसामच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडने (एनआरएल) बांबूपासून इथेनॉल उत्पादन करण्यासाठी फिनलँडच्या एका कंपनीसोबत करार केला आहे. सीआयआयच्या एका कार्यक्रमात एनआरएलचे कार्यकारी संचालक भास्कर ज्योती फुकन यांनी सांगितले की, कंपनीने जैव इथेनॉल प्लांटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. फुकन यांनी सांगितले की, आम्ही बांबूपासून इथेनॉल उत्पादन करण्यासाठी फिनलँडच्या फर्मसोबत करार केला आहे. शेतकऱ्यांकडून बांबू खरेदी केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल.

फुकन म्हणाले की, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कंपनी कॅप्टिव्ह वीज उत्पादनातून बाहेर पडून ग्रीडशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी कंपनीने हरित वीज उत्पादकांसोबत विज खरेदीचा करार केला आहे. त्यांनी सांगितले की, भारताला कच्च्या तेलाच्या किमतीच्या अस्थिरतेपासून बाहेर पडण्याची गरज आहे. आम्ही या प्रयत्नांमध्ये सरकारची साथ देण्याचा प्रयत्न करू. ते म्हणाले, पूर्वोत्तरमध्ये खूप पाणी आहे. त्यामुळे हायड्रोजनच्या स्थानिक रुपात याचे उत्पादन केले जाऊ शकते. आणि हरित ऊर्जेच्या रुपात याचा वापर केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here