आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 218.93 (2,18,93,14,422) कोटींची संख्या ओलांडली आहे.
देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली. आतापर्यंत 4.10 (4,10,64,468) कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. तसेच 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक लसींच्या मात्रा देण्यास आरंभ झाला आहे.
भारतातील रुग्णसंख्या सध्या 29,251 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.07 टक्के इतकी आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे. गेल्या 24 तासांत 3,884 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे, आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या सुरूवातीपासून) वाढून 4,40,51,228 इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासात 2,797 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 2,66,839 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.67 (89,67,48,226) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.30 टक्के तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.05 टक्के इतका आहे.
(Source: PIB)