सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड साखर कारखान्याने आगामी हंगामात १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार अरुण लाड यांनी दिली. ते मिल रोलर पूजन प्रसंगी बोलत होते. आ. लाड म्हणाले, यंदा कारखाना कार्यक्षेत्रात उसाचे पीक चांगले आहे. कारखान्याने आपली गाळप क्षमता प्रतिदिन ५,००० हजार टनावरून ७,५०० टनापर्यंत वाढविली आहे. कारखान्याकडे सध्या १४,५८० हेक्टर ऊस नोंद झाली झाली असून १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आ. लाड यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. ऊस तोडणीमध्ये सुसूत्रता आणून नियोजनबद्ध हंगाम पाडण्याची परंपरा यंदाही कायम राखली जाईल, असे ते म्हणाले. यावेळी प्रशांत पवार, महेंद्र करांडे, जगदीश महाडिक, विराज पवार, हेमंत मोरे, सुरेश पाटील, दिलीप थोरबोले, अनिल पवार आदी उपस्थित होते.