कधीकाळी उच्च गुणवत्तेच्या साखर उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या कटक जिल्ह्यातील सुनपाल येथील बारंबा साखर कारखान्याचा (Baramba Sugar Mill) लिलाव होणार आहे. याबाबत युनियन बँकेने कारखान्याच्या प्रवेशद्वारावर नोटीस जारी केली आहे.
याबाबत ओडिशा TV ने दिलेल्या वृत्तानुसार, साखर कारखान्यावर शेकडो लोकांची उपजिविका अवलंबून होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी कारखान्याला वाचविण्यासाठी सरकार आणि राजकीय नेत्यांना पुढाकार घेण्याचा आग्रह केला होता.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या साखर कारखान्याकडून उत्पादित साखरेची गुणवत्ता देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे म्हटले जात होते. आणि आम्हा ओडिशातील लोकांना कारखान्यावर गर्व होता. मात्र, कारखान्याचा लिलाव होत आहे की, खूप चिंतेची बाब आहे.
त्यांनी साांगितले की, “तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ने यांनी १९८४ मध्ये या कारखान्याची कोनशीला ठेवली होती. तत्कालीन मुख्यमंत्री जानकी बल्लभ पटनायक आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे कृषी आधारित उद्योग स्थापन करण्यात आला होता.”
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, एखादे जन आंदोलन कारखान्याला वाचवू शकते. आम्ही आपल्या स्थानिक आमदारांकडे २७ कोटी रुपयांची तरतूद करून कारखाना वाचविण्याचे आवाहन केले आहे. कारखाना सुरू राहणे महत्त्वाचे आहे.