ओडिशा: तारांगिणी डिस्टिलरीजची इथेनॉल प्लांट उभारण्याची योजना

गंजाम : ओडिशातील गंजाम जिल्ह्यातील गहनपल्लीमध्ये तारांगिणी डिस्टिलरीज १२० केएलपीडी क्षमतेच्या एक धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट स्थापन करीत आहे. प्रस्तावित प्लांट १७.७४ एकर जमिनीवर स्थापन करण्यात येईल. यामध्ये तीन मेगावॅटचा को-जनरेशन पॉवर प्लांटचाही समावेश असेल.

४८० सीएमडीची एकूण पाण्याची गरज बघुआ धरणातून पूर्ण केली जाईल. आणि २.६ मेगावॅट विजेची आवश्यकता इन हाऊस वीज प्लांटमधून पूर्ण होईल. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी ताांगिणी डिस्टिलरीला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (एमओयएफ आणि सीसी) कडून पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे. कंपनीने जुलै २०२३ पर्यंत आपला प्लांट सुरू करण्याची तारीख निश्चित केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here