सोलापूर : सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात उत्पादित झालेले पहिले साखरेचे पोते कारखान्याचे चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सदाशिवनगर ते शिखर शिंगणापूर असा सुमारे २५ किलोमीटरचा पायी प्रवास करुन शंभू महादेव चरणी अर्पण केले. यावर्षी सोलापूर, सातारा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने हे जिल्हे दुष्काळी जाहिर करावेत व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी करुन शंभू महादेवाने शेतकऱ्यांना समृध्दी द्यावी अशी महादेव चरणी मागणी केल्याचे आ.मोहिते-पाटील यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते पहिल्या साखर पोत्याचे कारखाना कार्यस्थळावर पूजन करण्यात आले. त्यानंतर ही साखर आ.मोहिते-पाटील यांनी घेतली व ते सकाळी सहा वाजता नातेपुतेमार्गे शिखर शिंगणापूरकडे पायी निघाले. त्यांच्यासमवेत अर्जुनसिंह मोहिते-पाटील, ईशिता मोहिते-पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शंभू महादेवाची पूजा व आरती करुन साखर पोते शंभू महादेव चरणी अर्पण केले. यावेळी सचिन ठोकळ, संचालक सुरेश मोहिते, संजय कोरटकर, चंद्रकांत शिंदे, नंदन दाते, शिवाजी गोरे, सुनील माने, एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजीत डुबल, जनरल मॅनेजर रवींद्र जगताप, चिफ इंजिनिअर प्रफुल चव्हाण, चिफ केमिस्ट दत्तात्रय देशमुख, सिक्युरिटी ऑफिसर ज्ञानदेव पवार, उपसभापती मामासाहेब पांढरे, लक्ष्मण पवार, रिपाई अध्यक्ष सोमनाथ भोसले, राहूल वाघमोडे, प्रताप सालगुडे पाटील, संजय राखले, राजेंद्र काकडे, आण्णा आर्वे, सतीश व्होरा, सुदर्शन देसाई, बाळासाहेब वाईकर, मिलींद गायकवाड आदी उपस्थित होते.