साखर कारखाना विक्री घोटाळाप्रकरणी फास आवळणार

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील २१ साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेल्या कथिक गैरव्यवहाराचा तपास राज्य सरकारने प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या तपासात अनेक अधिकारी जाळ्यात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाचे सरकार असताना २१ साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे बोलले जाते. याप्रकरणी गोमती नगर पोलिस ठाण्यात २०१७ मध्ये तक्रार दाखल झाली होती. पण, चौकशीत फारसे काही समोर आले नाही. राज्य सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने हाती घेतले आहे. त्यामुळेच याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयच्या लखनऊ अँटी करप्शन विभागाने एफआयआर दाखल केल्यानंतर आता यात बडे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे त्यात विधानपरिषदेच्या माजी आमदारांच्या मुलासह सात व्हीआयपींची नावे आहे.

सीबीआयच्या टीमने एफआयआर दाखल करण्याबरोबरच गोमती नगर पोलिस ठाण्याकडून झालेल्या चौकशीचीपूर्ण माहिती घेतली आणि संबंधित कागदपत्रेही आपल्या ताब्यात घेतली आहेत. त्याच्या एका टीमने सीबीसीआयडीच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली आहे. याचीसगळी माहिती घेतल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सूत्रे हलवली. याबाबत अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन-चार दिवसांत काही जणांची चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. सीबीआयने एफआयआर दाखल करण्यापूर्वी केलेल्या चौकशीमध्ये दोन कंपन्या बनावट असल्याचे उघड झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here