रामपूर :पीलीभीत पासून बहेडी येथून टोळ दल शुक्रवारी रामपूर पोचले. बिलासपूर च्या हजरतपूर गावात टोळ दलांना पाहून शेतकर्यांनी गोंधळ केला. येथील शेतकरी पहिल्यापासूनच सर्तक होते आणि शेताता थाळ्या घेवून उभे होते. कृषी अधिकारी देखील तिथे पोचले. फायर ब्रिगेड च्या दोन गाड्यादेखील पोचल्या आणि कीटकनाशक औषध फवारणी करण्यात आली.
प्रदेशातील विविध जनपदमध्ये टोळ दलाने आपला आतंक माजवला आहे. टोळ दल पीकांवर हल्ला चढवून काही तासातच पीकांचे नुकसान करतात. ज्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होते. गुरुवारी बिलासपूरमध्ये स्थानिक प्रशासनाने बरेली जनपथ च्या सीमेपासून सटे गावातील शेतकर्यांना सूचित केले होते की, टोळ दल रात्री कोणत्याही वेळी हल्ला करु शकते, ज्यावर बिलासपूर च्या मंगतपूर, आकिलपूर, लखीमपूर, सितौरा, करतारपूर आणि गोधी आदी गावातील शेतकरी अलर्ट झाले. शुक्रवारी अनेक शेतकरी शेतांमध्ये थाळी घेवून आले. संद्याकाळी हजरतपूरगावात टोळ दल आल्यानंतर थाळ्या वाजवण्यात आल्या. राष्ट्रीय पंचायती राज प्रधान संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरजीत सिंह यांनी सांगितले की, टोळ दल येणार असल्याच्या सूचनेवर बॉर्डर पासून सटे क्षेत्रातील विविध गावातील शेतकर्यांना सूचित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी फटाके आणि थाळ्या वाजवण्यासह कीटकनाशक फवारणीचा उपयोग करण्याच्या सूचनाही दिल्या. जेणेकरुन टोळ दलांना पळवले जावू शकेल. एसडीएम डॉ. राजेश कुमार यांच्या नुसार क्षेत्रीय शेतकर्यांना सूचना देवून टोळ दलाशी निपटण्यासाठी कीटकनाशक फवारणी टँक तयार केले आहेत. लेखपालांना गावांमध्ये तैनात केले आहे. त्यांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी शेतकर्यांना जागरुक करावे. दोन हजार लीटर औषध उपलब्ध करण्यात आली आहे. रामपूर जिल्हा कृषी अधिकारी सीजी सागर यांनी सांगितले की, शुक्रवारी टोळ दल पीलीभीत च्या पूरनपूर पासून बरेली जिल्ह्यातून बिलासपूर क्षेत्रामध्ये आले आहे. ते स्वत: टीम घेवून जागेवर पोचले. फायर ब्रिगेड च्या दोन गाड्या देखील पोचल्या आहेत. टोळ दलाला मारण्यासाठी 2000 लीटर औषधाची व्यवस्था करण्यात आली आहे. फायर ब्रिगेडची फवारणी सुरु आहे. कृषी विभागाचे कर्मचारी गावागावात तैनात करण्यात आले आहेत. हे शेतकर्यांना जागरुक करत आहेत. त्यांना सांगत आहेत की, टोळ दलाला पळवण्यासाठी शेतांवर थाळी वाजवा, डीजे वाजवा, गोंधळ करा आणि फटाके वाजवा जेणेकरुन टोळ दल पळून जाईल आणि पीकाचे नुकसान होणार नाही. याबाबत ऊस विभाग आणि साखर कारखानेही सतर्क आहेत. जिल्हा अग्निशमन अधिकारी मतलूब हुसैन यांनी सांगितले की, सर्व तहसील साठी फायर ब्रिगेडची गाडी उपलब्ध करण्यात आली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.