भीमाशंकर साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांचा सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्काराबद्दल सत्कार

पुणे : येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये उसाला प्रती टन विनाकपात ३,२०० रुपये दर दिला. तसेच कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार नुकताच मिळाला. याबद्दल वळती ग्रामस्थांच्यावतीने भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षांसह सर्व संचालकांचा सोमवारी सत्कार केला. विठ्ठल-रुख्मिणी सभागृहात हा सत्कार समारंभ झाला. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून गावातील शाळेला स्वच्छतागृहासाठी ८ लाख ६१ हजार रुपये मंजूर झाले आहेत.हे काम लवकरच सुरू होणार आहे. याबद्दलही कारखान्याचे अभिनंदन करण्यात आले.

भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व कारखान्याच्या सर्व संचालकांचा शाल, श्रीफळ देऊन व पेढे भरवून सत्कार करण्यात आला. सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लोंढे, माजी संचालक किसनराव लोखंडे, उद्योजक मनोहर शेळके, खंडू लोखंडे, जनाबाई अजाब, शिवाजी लोखंडे, ज्ञानेश लोंढे, डॉ. अशोक भोर, बारकू बेनके, मारुती लोखंडे, अतुल भोर, संतोष भोर, अजित भोर आदींसह नागापूर ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते. शिवाजीराव लोंढे यांनी प्रास्ताविक केले. तानाजी लोखंडे यांनी आभार मानले.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here