बुढाना : भैसाना साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी साखर विक्री करून कारखाना शेतकऱ्यांची थकीत बिले देणार आहे, असे आश्वासन दिले.
अमर उजालामधील वृत्तानुसार, भाकियूच्या कार्यकर्त्यांनी ३० मेपासून भैसाना साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. तीन जुलै रोजी ऊस समितीचे सचिव बि. के. राय यांनी आंदोलनस्थळी येवून शेतकऱ्यांना सांगितले की, साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनकाळात पाच कोटी रुपयांची अतिरिक्त साखर विक्री केली आहे. गुरुवारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जंग बहादुर तोमर आणि ऊस विभागाचे व्यवस्थापक शिवकुमार त्यागी हे आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, साखर विक्री केल्यानंतर आलेली रक्कम शेतकऱ्यांना देयात आली आहे. कारखान्याने दिलेल्या यादीनुसार शेतकऱ्यांना थकीत बिले दिली जात आहेत.
भाकियूचे पदाधिकारी अनुज बालियान आणि संदीव पवार यांनी शेतकऱ्यांना फसवून साखर विक्री सहन केली जाणार नाही असा इशारा दिला. आतापर्यंत सर्व समस्यांची सोडवणूक झालेली नाही असे ते म्हणाले. जोपर्यंत समस्या सुटत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल असे ते म्हणाले. यावेळी विकास त्यागी, इसरार, राजवीर सिंह, निटू, साबिर, विपिन, धिरसिंह, चरणसिंह, अनिल व अजीत उपस्थित होते.