Oil India कडून इथेनॉल क्षेत्रात ८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना

नवी दिल्ली : जैवइंधन उत्पादनासाठी भारताची कटिबद्धता आणि अलीकडेच जागतिक बायोफ्युएल अलायन्स लाँच केल्यावर, ऑइल इंडिया (Oil India) २ जी (second generation) इथेनॉल उत्पादन क्षेत्रात अंदाजे ८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. ऑइल इंडियाकडून उपकंपनी Numaligarh Refinery Ltd (NRL) (NRL) सह एकत्रित गुंतवणूक केली जाईल आणि त्यानंतर प्लांटची स्थापना केली जाईल.

याबाबत, प्रसार माध्यमांशी बोलताना ऑइल इंडियाचे सीएमडी रणजीत रथ म्हणाले की, कंपनी २०४० पर्यंत २ जी इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) आणि सौर ऊर्जा या क्षेत्रांमध्ये ‘नेट-शून्य’ उत्सर्जन साध्य करण्यासाठी २५,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा विचार करत आहोत. ते म्हणाले, २ जी इथेनॉल क्षेत्रात आम्ही सुमारे ८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक पाहत आहोत. सुमारे 25 सीबीजी संयंत्रांसह, कंपनी आसाममध्ये ६४० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प आणि हिमाचल प्रदेशमध्ये १५० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here