साओ पाउलो(ब्राजील): जगातील सर्वात मोठी साखर उत्पादक कंपनी Raízen चे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्डो मुसा म्हणाले, जागतिक तेलाच्या किंमतींमध्ये झालेल्या मोठया घसरणीमुळे ब्राजील मध्ये एप्रिल पासून सुरु होणाऱ्या हंगामात साखर उत्पादनाला गती मिळू शकते.
ते म्हणाले, यावर्षी साखर उत्पादन वाढण्याची आशा पहिल्यापासूनच होती, आणि तेलाच्या कमी झालेल्या किंमती नी या योजनेला अधिक गती दिली. इंधनाच्या दराने चांगला आर्थिक परतावा दिल्याने ब्राजीलने गेल्या दोन हंगामात साखरेच्या तुलनेत इथेनॉल चे अधिक उत्पादन केले. पण येणाऱ्या हंगामासाठी हा दृष्टीकोन बदलत आहे.
तेलाच्या कमी किमतीमुळे ब्राजील च्या बाजारात गैसोलीनच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे कारखाने आता साखर उत्पादनावर लक्ष केंद्रीत करत आहेत.
अंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्या तेलाच्या किमतीत मोठी घट नोंदवली गेली आहे. अलीकडेच OPEC देशांमध्ये कच्च्या तेलाचा पुरवठा कमी करण्याबाबतची चर्चा फार जोर धरु शकली नाही. कमी मागणीमुळे पुरवठा बंद करण्याच्या निर्णयातून रूस ने काढता पाय घेतला होता. यानंतर लगेचच सऊदी अरब च्या अरामको (Aramco) ने तेल किंमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली, यामुळे तेल बाजारात आता प्राइस वॉर होण्याची भिती निर्माण झाली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.