कोल्हापूर : राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार मे. टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. कारखान्याचे व्यवस्थापन प्रमुख भरत कुंडल यांनी ही माहिती दिली. कारखान्याने ३१ जानेवारी २०२४ पर्यंतची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कारखान्याचे व्यवस्थापन प्रमुख भरत कुंडल म्हणाले की, ओलम कारखान्याने नुकताच ५ लाख मे. टन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. आम्ही अधिकाधिक शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाला प्राधान्य दिले आहे. वेळेत ऊस बिले देण्याची परंपरा आम्ही कायम ठेवली आहे. तोडणी ओढणी, वाहतूकदारांच्या बिलांची वेळोवेळी पूर्तता केली आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस ओलम साखर कारखान्याला पाठवावा, असे आवाहन कुंडल यांनी यावेळी केली.