गडहिंग्लज विभागातील ऊस गाळपात ओलम शुगर्सची आघाडी

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात गडहिंग्लज विभागात ऊस गाळपामध्ये चंदगड तालुक्यातील ‘ओलम शुगर्स’ने आघाडी घेतली आहे. ओलम शुगर्सने सर्वाधिक ६,२३,४६५ मे. टन उसाचे गाळप केले. मात्र विभागातील एकाही कारखान्याच्या गळिताची उद्दिष्टपूर्ती यंदा होऊ शकली नाही. एकेकाळी नावाजलेला आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना गाळपात पिछाडीवर राहिला. विभागात सर्वांत कमी १ लाख ३८ हजार ४८१ मे. टन उसाचे गाळप गडहिंग्लज कारखान्याने केले.

गडहिंग्लज आणि आजरा साखर कारखान्याच्या गळिताची सांगता झाली असून दौलत- अथर्व कारखान्यांच्या हंगामाची सांगता या आठवड्यात होत आहे. यंदा येथील ऊस कर्नाटकातील साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात गेला. दरम्यानच्या काळात ऊस पळवापळवीचा फटका साखर कारखान्याला बसला. सुरुवातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन आणि अवकाळी पाऊस पडल्याने हंगाम उशिरा सुरू झाला. ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी ॲडव्हान्स घेतलेल्या काही बाहेरच्या व स्थानिक टोळ्यांनी दांडी मारली. त्याचा फटका तिन्ही तालुक्यातील कारखान्यांना बसला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here