कोल्हापूर : ओलम साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात ६ लाख ४१ हजार १११ टन उसाचे गाळप केले आहे. आगामी काळात मका व तांदळापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित करणार असल्याची माहिती ‘ओलम’चे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी व्यक्त केले. राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. नामदेव पाटील यांनी प्रास्ताविक केले.
शेती अधिकारी दत्तराज गरड, सशांक शेखर यांनी गळीत हंगामाची माहिती दिली. यावेळी सर्वाधिक उसाची वाहतूक करणाऱ्या १२ वाहतूकदारांचा सत्कार केला. कुंडल म्हणाले, ऊस दर चांगला असल्याने शेतकऱ्यांनी अधिकाधिक ‘ओलम’ला उसाचा पुरवठा केला नव्या प्रकल्पामुळे उसाबरोबर आता मका व तांदूळ पिकालाही चांगला दर मिळणार आहे. यामुळे स्थानिक रोजगार वाढीला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढणार आहे. यावेळी एचआर नीता लिंबोर, अनिल पाटील, संतराम गुरव, भागोजी लांडे, राजू निर्मले, रवळनाथ देवण, रणजित सरदेसाई, जयदीप जैन आदी उपस्थित होते. सतीश कागणकर यांनी सूत्रसंचालन केले.