इंधन वितरण कंपन्यांनी (OMCs) खराब झालेले धान्य आणि मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी अतिरिक्त प्रोत्साहन दर जाहीर केला आहे. इथेनॉल मिश्रणाचा १२ टक्के हा दर साध्य करण्याचे उद्दिष्ट कायम राखण्याच्या सरकारच्या धोरणाशी सुसंगत असा हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) अनुदानित तांदळाचा पुरवठा तात्पुरता थांबवल्यानंतर ओएमसींनी हे पाऊल उचलले आहे.
या इथेनॉलसाठी तत्काळ प्रभावाने प्रती लिटर ३.७१ रुपये दरवाढ करण्यात आली आहे. डिस्टिलरीजनी आपले उत्पादन कायम राखावे असा या दरवावाढीचा उद्देश असल्याचे दिसून येते. आता, नुकसानग्रस्त धान्य आणि मक्यासाठी एकूण प्रोत्साहन रक्कम अनुक्रमे ₹८.४६ प्रती लिटर आणि ₹९.७२ प्रती लीटर मिळेल. यामध्ये नुकसान झालेले धान्य आणि मक्याच्या एकूण प्रोत्साहन रकमेचा समावेश आहे, यामध्ये ७ ऑगस्ट रोजी दिलेल्या अंतरिम प्रोत्साहन रक्कमेचादेखील समावेश आहे.
FCI ने इथेनॉल उत्पादनासाठी तांदूळ पुरवठा स्थगित केल्यामुळे डिस्टिलरीज बंद झाल्यामुळे हे उपाय अंमलात आणले गेले आहेत असे मानले जाते. सात ऑगस्ट रोजी, OMCs द्वारे इथेनॉलची खरेदीचा दर ₹४.७५ प्रती लीटरने वाढवून ₹६०.२९ प्रती लिटर करण्यात आली. या इथेनॉलचे उत्पादन खराब किंवा तुटलेल्या तांदळापासून केले जाते. मक्यावरील इथेनॉलच्या किमतीत ६.०१ रुपयांची वाढ करून हा दर ६२.३६ रुपये प्रती लिटर करण्यात आला आहे.