OMCs कडून ११२ कोटी लिटर इथेनॉलसाठी निविदा जारी

नवी दिल्ली : तेल वितरण कंपन्यांनी (OMCs) ऑटो ईंधनासोबत मिश्रणासाठी जवळपास ११२ कोटी लिटर इथेनॉल (denatured anhydrous ethanol) च्या करारासाठी मंगळवारी एक निविदा जारी केली आहे. निविदा जमा करण्याची अंतिम मुदत २० जून आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने (BPCL) इथेनॉल पुरवठा वर्ष २०२१-२२ मध्ये इथेनॉल पुरवठ्यासाठी निविदा जारी केली आहे. याची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत आहे. ५ जूनपर्यंत OMCs नी ४४३.२४ कोटी लिटरसाठी संयुक्तरित्या Letter of Intent (LoIs) जारी केले आहे. यामध्ये जवळपास ४३९.८० कोटी लिटरचे करार करण्यात आले आहेत. आणि २२४.९३ कोटी लिटरची डिलिव्हरी देण्यात आली आहे.

द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार ५ जूनपर्यंत उसापासन तयार झालेल्या इथेनॉलसाठी ७९.२७ कोटी लिटरसाठी LoIs जारी करण्यात आले होते. तर जवळपास ७९ कोटी लिटरचे करार करण्यात आले आहेत. तर ६४.७८ कोटी लिटरच्या पावत्या करण्यात आल्या आहेत. बी हेवी मोलॅसीसबाबत २६९.६२ कोटी लिटरचे LoIs जारी करण्यात आले होते. यापैकी २६५.९८ कोटी लिटरचे करार होते. तर १२७.१० कोटी लिटरच्या रिसिट जारी केल्या आहेत. सी हेवी मोलॅसिसबाबत १३.३२ कोटी लिटरच्या LoIs जारी करण्यात आल्या आहेत. तर १२.७० कोटी लिटरचे करार करण्यात आले. ६.३१ कोटी लिटरच्या रिसिट्स जारी केल्या आहेत.

खराब धान्यापासून तयार केलेल्या इथेनॉलसाठी तेल वितरण कंपन्यांनी ४३.६५ कोटी लिटरसाठी LoIs जारी करण्यात आले आहे. यापैकी ३६.८८ कोटी लिटरचे करार करण्यात आले आहेत. तर १२.१३ कोटी लिटरच्या रिसिट्स जारी केल्या आहेत.
५ जूनपर्यंत OMCs नी १०.०४ टक्के मिश्रणाचे उद्दीष्ट गाठले आहे. भारताने निश्चित केलेल्या उद्दिष्यापूर्वी पाच ते सहा महिने आधी १० टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा गाठला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून रोजी घोषणा केली होती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, देशातील निवडक पेट्रोल पंपांवर २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध करून दिले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here