नवी दिल्ली : भारतीय अन्न महामंडळाने (FCI) इथेनॉल उत्पादनासाठी तांदळाचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकार इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी पावले उचलत आहे. आता, तेल विपणन कंपन्या (OMCs) खराब झालेले अन्नधान्य आणि मक्यापासून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलसाठी अतिरिक्त प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहे.
ET NOW च्या वृत्तानुसार, OMCs खराब झालेले अन्नधान्य आणि मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर प्रति लिटर 3.71 रुपयांचे अतिरिक्त प्रोत्साहन देण्याची योजना आखत आहेत. खराब अन्नधान्य आणि मक्यापासून उत्पादित इथेनॉलसाठी एकूण प्रोत्साहन रक्कम अनुक्रमे ₹8.46 प्रति लिटर आणि ₹9.72 प्रति लिटर असू शकेल. यामध्ये 7 ऑगस्टपासून वाढलेल्या किमतीसह खराब अन्नधान्य आणि मक्याच्या एकूण प्रोत्साहन रकमेचा समावेश आहे. 7 ऑगस्ट रोजी, OMCs द्वारे खराब किंवा तुटलेल्या तांदळापासून उत्पादित इथेनॉलची खरेदी किंमत ₹4.75 प्रति लिटरने वाढवून ₹60.29 प्रति लिटर करण्यात आली. याशिवाय मक्यापासून उत्पादित इथेनॉलची किंमत प्रतिलिटर 6.01 रुपये वाढवून 62.36 रुपये केली होती.