सोलापूर : गळीत हंगाम २०२४- २५ मध्ये गळीतास येणाऱ्या उसाचे बिल, तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचे बिल दर पंधरा दिवसाला अदा केले जाणार आहे. परिसरातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्ती जास्त ऊस ओंकार शुगर कॉर्पोरेशन्सकडे गळितास पाठवावा असे आवाहन ओंकार ग्रुपचे प्रमुख बाबूराव बोत्रे-पाटील यांनी केले. म्हैसगाव (ता. माढा) येथील ओंकार शुगर कॉर्पोरेशन्स साखर कारखान्याचा १७ वा बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगाम मोळी पुजनचा प्रारंभ आमदार संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुण्या म्हणून रेखा बोत्रे- पाटील उपस्थित होत्या.
रामभाऊ मगर यांनी प्रास्ताविक केले. सचिन मळगे यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच यशवंत शिंदे, वामनराव उबाळे, ओंकार ग्रुपचे व्यवस्थापक सागर मार्तंडे, जनरल मॅनेजर रामचंद्र मखरे, पोपट गायकवाड, सुरेश बागल, विजयकुमार पाटील, आप्पासाहेब उबाळे, लक्ष्मण पाटील, रविंद्र शिंदे, पोपट खापरे, दत्तात्रय जगताप. हर्षल बागल आदी उपस्थित होते.